शहरात भरणाऱ्या आठवडी बाजारासाठी घुग्गुस नगरपरिषदेने पार्किंगची व्यवस्था करून द्यावी, नागरिकांची मागणी

111

शहरात भरणाऱ्या आठवडी बाजारासाठी घुग्गुस नगरपरिषदेने पार्किंगची व्यवस्था करून द्यावी, नागरिकांची मागणी

चंन्द्रपुर/महाराष्ट्र
दि. 04 अक्टूबर 2021
घुग्घुस–प्रतिनिधि

सविस्तर. बातमी :-शहरात भरणाऱ्या आठवडी बाजारासाठी घुग्गुस नगरपरिषदेने पार्किंगची व्यवस्था करून द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.घुग्गुस शहरात प्रत्येक रविवारी आठवडी बाजार भरत असते. त्यामुळे या बाजारात नागरिकांची मोठी गर्दी असते.अशातच शहरात दोन्ही बाजूने रस्त्यावर नागरिक आपली वाहने ठेवत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच याच मार्गावरून जड वाहतूक सुद्धा होत आल्याने पायदळ चालणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून येजा करावी लागत आहे.

या मार्गावर अनेकदा छोटे मोठे अपघात घडले असून घुग्गुस नगर परिषदेने याकडे लक्ष देऊन बाजारात येणाऱ्या नागरिकांसाठी पार्किंगची व्यवस्था करून द्यावी अशी मागणी शहरातील नागरिकांनी नगर परिषद कडे केली आहे. तसेच पोलिसांच्या वाहतूक विभागाने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.