🛑जमनापूर येथील प्रकरण • इतर शिक्षित पात्र महिलेंवर अन्याय
◾साकोली / महाराष्ट्र 08. 06. 2023 रिपोर्ट : आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज
⭕सविस्तर बातमी : साकोली – जमनापूर येथील नुकतेच नव्याने निवड केलेल्या आशा सेविका निवड प्रक्रियेत काही वैयक्तीक कटकारस्थान करून एकाच कुटुंबातील व्यक्तींची पुन्हा पुन्हा निवड का.? हा पात्र शिक्षित महिलेंवर अन्याय झाला असून सदर प्रक्रियेवर शंभराहून अधिक नागरीकांनी आक्षेप घेत ही हेतुपुरस्सर निवड प्रक्रिया रद्द करून नव्याने फेरनिवड करा अश्या शंभरावर स्वाक्षऱ्यांसह ( ०७.जून.) ला प्रति सचिव गटग्रामपंचायत पाथरी, तालुका आरोग्य अधिकारी, प्रा.आ. केंद्र यांना निवेदन देण्यात आले आहे.
मौजा जमनापूर येथे नुकतीच आशा सेविकाची प्रक्रिया पार पडली येथे स्वमर्जीने यापूर्वीही एकाच साखरे या कुटुंबातील महिलेची निवड करण्यात आली. व आताही त्याच कुटूंबातील महिलेची निवड का.? त्यांना निवड प्रक्रियेची आतून पूर्वकल्पना देऊन परीक्षेच्या पेपर प्रश्नांची माहिती देण्यात आली. व पूर्वकल्पना दिल्याने मुलाखतीत साध्या त्याच प्रश्नांवर सहज उत्तरे देत त्याच महिलेची पुन्हा निवड करण्यात आली आहे. जेव्हा की जमनापूर येथे यापूर्वीही एकाच साखरे कुटुंबातील आशा सेविका म्हणून निवड झाली होती. यात वयोमर्यादा लक्षात न घेता केवळ अनुसूचित जातीच्या गटातील महिलेला हेतूपुरस्सर व काही आप्त हितासाठी प्राधान्य दिले आहे असा सर्व निवेदनकर्ते नागरीकांचा आरोप आहे. जमनापूर येथे सर्वच गटातील शिक्षित महिला बेरोजगार असतांनाच केवळ एकाच समुदायाच्या महिलेची वारंवार निवड करणे हा एकाधिकारशाहीपणा आहे. तेव्हा गावातील शैक्षणिक पात्रतेतून इतरही पात्र महिलेंना प्राधान्य देऊन रोस्टर पध्दतीने नव्याने कोणताच पक्षपाती न करता सरळ सरळ आशा सेविकांची गुणानुक्रमे निवड करावी व झालेल्या हेतूपुरस्सर निवड प्रक्रिया रद्द करून नव्याने फेरनिवड करण्यासाठी शंभराहून अधिक महिला पुरुष नागरीकांच्या स्वाक्षऱ्यांसह निवेदन देण्यात आले.