साकोलीजवळ ट्रैक्टर दूचाकी अपघातात एकाचा दूर्देवी मृत्यू ; पत्नी गंभीर

157

🛑साकोलीजवळ ट्रैक्टर दूचाकी अपघातात एकाचा दूर्देवी मृत्यू ; पत्नी गंभीर

🛑ट्रैक्टरचालक होता अल्पवयीन मुलगा • कुंभली येथील घटना

🔳 साकोली / महाराष्ट्र
08. 06. 2023
रिपोर्ट • आशिष चेडगे – उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

सविस्तर बातमी : साकोली : जवळील कुंभली येथे ( ०८.जून.) सकाळी १० सुमारास ट्रैक्टर व दूचाकी अपघातात दूचाकीचालकाचा जागीच दूर्देवी मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी अवस्थेत साकोली उपजिल्हा रुग्णालयात तातडीने उपचार सुरू आहे. या घटनेत ट्रैक्टरचालक हा अल्पवयीन मुलगा असून त्याकडे कुणी ट्रैक्टर दिला असा संताप घटनास्थळी सुरू असून साकोली पोलीस याची चौकशी करीत आहे.
सविस्तर की कुंभलीतून धान्याची पोती लादून साकोलीकडे जाणारा ट्रैक्टर क्रं. एम एच ३६ एल. ६८४४ ने रोडावरून जाणा-या दूचाकीस्वार अनमोल हटवार ३९ रा. ईटखेडा ता. मोर.अर्जूनी ( गोंदिया ) च्या बजाज पल्सर क्रं एम एच ३५ एलपी ४१ ला धडक दिली या भीषण धडकेत अनमोल हटवार यांचा जागीच दूर्देवी मृत्यू झाला असून त्यामागे बसलेली त्याची पत्नी ही रोडवर पडल्याने गंभीर जखमी अवस्थेत तीला साकोली उपजिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. सदर प्रकरणी ट्रैक्टर हा कुणाचा होता, त्या ट्रैक्टरच्या चालकाने अथवा मालकाने एका अल्पवयीन मुलाच्या हाती सहा चाकी ट्रैक्टर व तेही जड वजन लादून कसा काय दिला असे संतप्त प्रतिक्रिया घटनास्थळी उपस्थित होत होत्या. साकोली पोलीस ठाणे निरीक्षक राजेशकूमार थोरात यांचे मार्गदर्शनात घटनेची नोंद करण्यात आली असून मृतकाचे शवविच्छेदन उपजिल्हा रुग्णालयात सुरू होते. पुढील तपास साकोली पोलीस करीत आहेत.