📡 साकोली / महाराष्ट्र Tue. 25. 07. 2023 रिपोर्ट : आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज
🔳 सविस्तर बातमी | साकोली : “कृपया खर्रा / गुटखा खाऊन भिंतीवर वा इतरत्र थुंकू नये. आढळल्यास ५००/- रू दंड वसूल करण्यात येईल” असे वाक्य जागोजागी लिहिले आहे नुकतीच करोडोंची नविन निर्माण झालेल्या तहसील कार्यालयाच्या प्रत्येक जागी. पण या कडक नियमाचेच चक्क धिंडवडे काढले आहेत काही येथील कर्मचारी आणि येथे येणाऱ्या अति जागरूक जनतेनी. याला काय म्हणावे “शिकलेली काही अंगठाछाप जनता..की काही अशिक्षित पदवीधर कर्मचारी..?
🔳 साकोली येथील नविन तहसील कार्यालयाच्या इमारतीचे एक वर्षही झाले नाही लोकार्पण होऊन की काही “अशिक्षित” व अति जागरूक जनतेनी येथील काही कर्मचाऱ्यांनी त्याचा सत्यानाश करायला सुरुवात केली. येथील दोन्ही मजल्यावर ठराविक व मुख्य ठिकाणी असे शासकीय पत्रके हमखास पाहायला मिळतात व त्यांच्या बाजूला कोपऱ्यात आणि पाय-यांजवळ अशिक्षितांनी महान कार्य केलेले हे “थुकपॉलीश” कारनामा हमखास समोरच निदर्शनास येत आहेत. याकडे कुण्या अधिका-यांचे लक्ष नाही असे नाही म्हणता येईल. दररोजच्या आवागमनात हा “थुकपॉलीश” कारनामा हमखास पाहायला मिळेलच. या नविन इमारतीला थुकींचा लाल पिचकारी सत्यानाशी कारनामा करणा-या किती शिकलेले पण अंगठाछाप आणि अशिक्षित पण काही पदवीधर कर्मचारी यांवर आजपर्यंत या “थुकपॉलीश” योजनेचा शुभारंभ करणा-यांवर कारवाई करून आजपर्यंत किती रूपयांचा थुकपॉलीश दंड वसूल करण्यात आला.? एकही नाही ना..? मग दररोज या इमारतीच्या प्रत्येक विभागात आवागमन करणारे वरीष्ठ अधिका-यांना हा सत्यानाशी कारनामा दिसत नाही काय.? हमखास दिसतोच पण म्हणतात ना “अपने बाप का क्या जाता है” जाऐगा तो सरकार का..! एकदा येथे पूर्ण विभागाच्या आजूबाजूला सीसीटीव्ही कॅमेरे लाऊन बघा आणि शासकीय मालमत्ता ही आपलीच मालमत्ता हा ध्यास मनात आणून यावर जो मिळेल त्यावर कडक व दंडात्मक कारवाई करूनच बघा…! शिक्षित अंगठाछाप जनता व अशिक्षित पदवीधर कर्मचारीच थुंकण्याचे सोडा साधा कागदाचा तुकडाही शासकीय इमारतीच्या परीसरात टाकायला यांचा थरकाप उडेल आणि हे सत्य आहे.
[ Warning ⚠️ Do not 🚫 Copy this Global Maharashtra News ]