🔳 महामार्ग पोलीस विभागाने केली साकोलीत वाहतूक नियमावली •
⭕ महामार्ग सुरक्षा पथक गडेगाव अंतर्गत ठिकठिकाणी जनजागृती •
🔘 साकोली / महाराष्ट्र Mon. 31. 07. 2023 रिपोर्ट : आशिष चेडगे उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज •
🔳 सविस्तर बातमी • साकोली : महामार्ग पोलीस विभाग गडेगाव अंतर्गत महामार्गावर वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करून अपघातावर आळा घालण्यासाठी ( ३१ जुलै ) ला साकोली येथील बसस्थानक, तहसिल कार्यालय व पंचायत समिती येथे वाहतूक नियमावली जनजागृतीचे आयोजन करण्यात आले होते.
🔳 महामार्गावर वाढत्या अपघातांवर आळा घालण्यासाठी, शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन व त्याची नियमानुसार अंमलबजावणी करणे अत्यंत आवश्यक आहे. करीता साकोली येथील बसस्थानक आगार सर्व चालक वाहक, तहसील कार्यालय, पंचायत समिती येथील सर्व कर्मचारी आणि चालकवृंद यांना महामार्ग पोलीस गडेगाव यांनी वाहतूक नियमावली समजावून सांगितली. यात संपूर्ण वाहतूकीचे दिशानिर्देश, मार्गावरील प्रत्येक सुचनाफलके यांची सविस्तर माहिती देण्यात आली. सदर तिन्ही स्थळी उपस्थित तहसीलदार निलेश कदम, खंड विकास अधिकारी जाधव, साकोली आगार व्यवस्थापक सचिन सावरकर यांसह सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी आवर्जून उपस्थित होते. या वाहतुक नियमावली जनजागृतीत महामार्ग पोलीस गडेगाव पोलीस उपनिरीक्षक धर्मदास सावरकर, एएसाय रविंद्र पवनकर, एचसी राहुल गि-हेपुंजे, एनसीपी अतुल रायपूरकर, महामार्ग पोलीस विनोद उपरकर, प्रकाश तांडेकर, भुते, आगार वाहतूक नियंत्रक उईके आणि इतर वाहतूक पोलीस या मार्गदर्शनात उपस्थित होते.
[ Global Maharashtra News Media ] Do not 🚫 Copy this News •