🔘 साकोली / महाराष्ट्र SUN. 06. 08. 2023 रिपोर्ट : आशिष चेडगे उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र •
🔳 साकोली : तालुक्यातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकाने ९ वर्षीय मुलीशी शारीरिक अश्लील चाळे केल्याने मुलीच्या आजीने केलेल्या तक्रारीवरून साकोली पोलीसांनी पोस्को अंतर्गत शिक्षकाला ( ०६ ऑगस्ट ) ला अटक केली आहे. या संतापजनक प्रकाराने तालुक्यातील वातावरण संतप्त झाले असून महिलावर्गांकडून त्या नराधम शिक्षकाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
🔳 तालुक्यातील एका गावातील शिक्षकाने दिनांक ०४ ऑगस्टला शाळेत खेळ शिकवत असताना मुलीच्या नको असणाऱ्या शरीराच्या भागाला स्पर्श केल्याने मुलगी ओरडून उठली. त्यानंतर मुलीने घरी जाऊन आजीला शाळेत घडलेली घटना सांगितली. एक महिन्यापूर्वी याच शिक्षकाने मुलीला शाळेच्या कार्यालयात एकटीला बोलवून अत्यंत घाणेरड्यारितीने शारीरिक अश्लील चाळे केले होते पुन्हा दिनांक ०४ ला या घटनेची पुनरावृत्ती झाल्याने ०९ वर्षीय मुलीच्या आजीने साकोली पोलीस स्टेशनला ०५ ऑगस्टला रात्री उशिरापर्यंत या घटनेची तक्रार केल्याने शिक्षक देवराम लक्ष्मण पटले वय ५६ या शिक्षकावर कलम ३७६ (२ )जे, ३७६ (२ ) एफ ३७६ सह कलम ४,६,८,१० व पोस्को अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय खोकले हे अधिक तपास करीत आहेत महत्त्वाचे म्हणजे ही शाळा एक शिक्षकी असून या शाळेत पहिली ते चौथीपर्यंत केवळ बाराच विद्यार्थी आहेत त्यातही दहा मुले व दोन मुली शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. या संतापजनक प्रकाराने तालुक्यासह शहरातील असंख्य महिलांनी या नराधम शिक्षकाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला जात असून याला उच्च शिक्षा देण्याची मागणी सोशल मिडीयातून जोर धरत आहे.