नित्यनिधी कार्य करणाऱ्या युवकांना आता आयुर्विमा क्षेत्रात काम करणे सोपे

139

🔘 नित्यनिधी कार्य करणाऱ्या अभिकर्त्याला आयुर्विमा क्षेत्रात काम करणे सोपे •

📕 सीएलआयए पुजा कुरंजेकर यांचे प्रतिपादन •

📡 साकोली / महाराष्ट्र
WED. 30. 08. 2023
रिपोर्ट : आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र

📕 साकोली : आज ग्रामीण भागातील लोकांना पैशाची बचत करण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत त्यामध्ये अनेक पतसंस्था, बँक आणि एल आय सी पॉलिसीच्या माध्यमातून बचत केली जाते. आज बऱ्याच बँक आणि पतसंस्था याचे व्यवहार डेली कलेक्शन करणाऱ्या अभिकर्त्यान मार्फत होत असते. मार्केट मधून लहान मोठे दुकानदार किंवा व्यापारी वर्गाकडून डेली कलेक्शन माध्यमातून अभिकर्ता पतसंस्थेत आणि बँकेत पैसे जमा करतात. या पैशातून पतसंस्था आणि बँक ग्राहकांना व्याजाने पैसे देऊन नफा कमविताता. तसेच काम करणाऱ्या अभिकर्त्याना कमीशन देखील देतात. कमीशनचा दर पतसंस्था आणि बँकेत साधारणतः ३ ते ४ टक्के असतो. त्यामुळे पतसंस्था आणि बँक नेहमी डेली कलेक्शनचे काम करणाऱ्या इच्छुक व्यक्तींची अभिकर्ता म्हणून नियुक्ती करतात.
डेली कलेक्शनचे काम करणारे अभिकर्ता कमीत कमी १५ ते २० किलोमीटर इतके अंतर रोज फिरून कलेक्शनचे काम करतात. यामध्ये रोज त्यांचा ४ ते ५ तास इतका वेळ जातो व कलेक्शनचे काम करतांना गाडीला लागणारा पेट्रोल खर्च त्यांना स्वतःच करावा लागतो. अशा परिस्थितीत त्यांना मिळणाऱ्या कमीशन मधून पेट्रोल खर्च वजा केले तर त्यांना मेहनती शिवाय जास्त काहीच मिळत नाही. डेली कलेक्शन करणाऱ्या अभिकर्त्यानी एल आय सी एजन्सीचे काम हातात घेतले तर त्याचा फायदा जास्त होईल. कारण डेली कलेक्शन करणारे अभिकर्त्यानचे मार्केट मध्ये रोज फिरणे सुरू असते. त्यांच्या संपर्कात अनेक लोक येत असतात. ते डेली कलेक्शन चा काम मोठ्या आवडीने करतात. त्यांनी जर एल आय सी चे काम हातात घेतले तर त्यांना एकाच कामात दोन काम करता येईल व डेली कलेक्शनच्या माध्यमातून जेवढे पैसे मिळतात त्यापेक्षा आठ पट जास्त पैसे कमविता येईल. अशा प्रकारे एकाच वेळेस आपल्याला दोन काम करून तेवढयाच मेहनती मध्ये जास्त पैसे कमविता येईल. शिवाय नवीन एल आय सी अभिकर्त्याना त्यांनी एजन्सी घेताच ३ लाख रुपयाचा ग्रुप इन्शुरन्स असतो. जर त्यांना काही कमी जास्त झाले तर त्यांच्या परिवारातील नामित व्यक्तीला दिला जातो.
📕 डेली कलेक्शन करणाऱ्या व्यक्तीला आपल्या डेली कलेक्शनचा फायदा घेऊन एल आय सी व्यवसाय वाढविणे सोपे जाते. याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांचे मार्केट मध्ये फिरणे सुरू असते. डेली कलेक्शन करणारे व्यक्ती अनेक लोकांच्या संपर्कात येतात. त्यांना एल आय सी पॉलिसी मिळणे इतर अभिकर्त्यान पेक्षा सोपे जाते. ते डेली कलेक्शनच्या स्वरूपात एल आय सी पॉलिसीचा प्रीमियम वसूल करू शकतात. त्याकरिता त्यांना वेगळे एक डेली कलेक्शनचे खाते ओपन करावे लागेल व त्यामार्फत ते एल आय सी पॉलिसी काढून प्रीमियम भरू शकतात. यामध्ये त्यांना डेली कलेक्शन व एल आय सी एजन्सी या दोघांचाही फायदा होईल व जास्तीत जास्त पैसे कमविता येईल. याकरिता डेली कलेक्शन करणाऱ्या अभिकर्त्याला एल आय सी चे काम करणे सोपे जाते जर डेली कलेक्शन करणाऱ्या अभिकर्त्याने एल आय सी चे काम केले नाही तर त्यांच्या खातेदाराकडून दुसरेच एल आय सी अभिकर्ता पॉलिसी काढून धेईल. याकरिता डेली कलेक्शनचे काम करणाऱ्या अभिकर्त्यानी एल आय सी एजन्सीचे महत्त्व समजून लवकरात लवकर एजन्सी द्यावी असे आवाहन साकोली शाखेतील एल आय सी अभिकर्त्यांची भरती करणारी (सी. एल. आय. ए) पुजा नरेश कुरंजेकर यांनी केले आहे.

[ Global Maharashtra News Media ™ ]