साकोलीत मध्यरात्री SDO धाडीत दोन डंपर डेपोत जमा •

81

🛑 मध्यरात्री एसडीओंचे धाडसत्र : दोन वाळू डंपर केले डेपोत जमा •

साकोलीतील धडक कारवाई : पोलीस पेट्रोलींग पथकाचीही मदत •

🔘 साकोली / महाराष्ट्र
WED. 11. 10. 2023
🔘 रिपोर्ट : आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र.

🔳 साकोली : शहरातील राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री शासनाचा महसूल बुडवून विनारॉयल्टीने वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन डंपरावर येथील उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले व पथकाने धाडसत्रात ही कारवाई करीत दोन्ही डंपर जवळील साकोली म.रा.प.मं. आगारात जमा केले. ही बेधडक कारवाई बुधवार ११ ऑक्टोंबरच्या मध्यरात्री २:३० वाजता केली असून यात वाहतूक पोलीस पेट्रोलींग पथकाचेही सहकार्य विशेष राहिले.
🔳 टाटा हाईवा क्र. एम एच ३१ एफसी ५३८१ यात विनारॉयल्टीने तालुक्यातील नदीघाटाहून वाळूची चोरी करतांना पथकाला माहिती मिळाली. यात मध्यरात्रीच उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले हे महसूल विभागीय चमुंसह राष्ट्रीय महामार्गावर वाळू चोरीत वाहतूक करतांना पकडले. या कारवाईत महामार्ग पोलीस विभाग गडेगाव शाखेची पेट्रोलींग चमु महामार्गावर करडी नजर ठेवून या धडक कारवाईत महसूल प्रशासनाला सहकार्य केले. यात अजून अशोक लेलॅंड डंपर क्र. एम एच ४० सीडी १५८१ ने नुकतेच मुरूम चोरून नेतांनी याच महसूल पथकाने धाडसत्रात कारवाई करून हा पण डंपर आणि एक विना क्रमांकाचा ट्रैक्ट्ररही वाळू चोरीत बसस्थानक आगारात जमा केला आहे. यात पहिला वाळू डंपर मालक पिंडकेपार येथील राजकीय क्षेत्रातील पंकज कापगते असून दूस-या डंपरमालकाचे व ट्रैक्ट्ररमालकाचे नाव कळू शकले नाही. सदर धडक कारवाई झाल्यानंतर साकोली शहरात काही डंपरमालकात यात “सेटींग” होत असल्याचे बोलले जात आहे.