🛑 साकोली बस स्थानक येथे नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा
📕 काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या प्रयत्नाने साकोली आगाराला नवीन ६ बस प्राप्त •
◾ साकोली / महाराष्ट्र MON. 16. 10. 2023 रिपोर्ट : आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज
◾ साकोली : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या विशेष प्रयत्नातून साकोली बस स्थानक येथे नवीन ६ वाहने प्राप्त झाली. त्या बसेसचा ( ता. १६. ऑक्टों.) ला लोकार्पण सोहळा जि.प. सभापती मदन रामटेके व आगार व्यवस्थापक सचिन आगरकर यांच्या उपस्थितीत पार पडला.
◾ अनेक दिवसांपासून प्रवाशांची गर्दी लक्षात घेता व समोरील दिवाळी सण लक्षात घेता साकोली आगारात नवीन बसेस याव्यात या मागणीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी प्रतिसाद देत तात्काळ साकोली आगारात नवीन सहा बसेस मिळवून दिल्या. त्यामुळे प्रवाशांनी आणि नागरिकांनी आमदार नानाभाऊ पटोले यांचे आभार व्यक्त केले. या नवीन बसेस मुळे जनतेचा दिवाळी सणांतील आनंददायी प्रवास सुखद होणार आहे.
◾ या लोकार्पण प्रसंगी जि.प.स. नारायण वरठे, जि.प.स. शितल राऊत, पं. स. सभापती गणेश आदे, पं.स.स. डॉ. ललित हेमने, पं. स.स. करुणा वालोदे, तालुका काँग्रेस अध्यक्ष अशोक कापगते, शहर काँग्रेस अध्यक्ष दिलीप मासूरकर, शहर महिला काँग्रेस अध्यक्षा पुष्पा कापगते, महासचिव विजय साखरे, माजी सदस्य दिपक मेंढे, हरगोविंद भेडारकर, अश्विन नशिने, जितेंद्र नशिने, उमेश कठाणे, दिलीप निनावे, जितेंद्र मेश्राम, रा.प.मं. विभाग नियंत्रक तनुजा अहिरकर, महापर्यवेक्षक श्रीकांत गभने, सहा. वाहतूक निरीक्षक साखरवाडे, वाहतूक निरीक्षक विजय नंदागवळी, सर्व प्रमुख अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच काँग्रेस कमिटीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या उपस्थितीत नव्या बसेसचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.