धान खरेदीत जाचक अटी रद्द करा – पूर्व आमदार बाळा काशिवार

65

🛑 धान खरेदीत जाचक अटी रद्द करा – माजी आमदार – बाळा काशिवार

🛑 मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दिले पत्र

🔘 साकोली / महाराष्ट्र
WED. 18. 10. 2023
रिपोर्ट : आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र

🔳 साकोली : किमान आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत खरीप २०२३-२४ मधील धान खरेदी संस्थांना लावलेल्या जाचक अट्टी शेतकरी हितार्थ रद्द करण्याबाबद साकोलीचे माजी आमदार राजेश (बाळा) काशिवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व छगन भुजबळ यांना पत्र देत आगामी दिवाळी सणाला शेतकऱ्यांना सहज सोपी प्रक्रिया करण्याची रास्त मागणी केली आहे.

🔳 व्यवस्थापक, (अन्नधान्य) मुंबई यांचे पञ, जा.क्र. रा.शा.ख. आकि / खजो / धा.ख. निकष २०२३- २४/५७२ दि. १२/१०/२०२३ नुसार भंडारा जिल्ह्यात विक्रमी धानाचे उत्पादन घेतले जात असून, शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी ‘दि महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन म.रा. मुंबई’ मार्फत केली जात आहे. या माध्यमातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपन्न देखील झाला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बेरोजगार संस्थांच्या माध्यमातून धान खरेदीचे काम नियमित सुरू असल्याने पुर्वीसारखा शेतकऱ्यांना धानाची विक्री करतांना होणार आस व पिळवणूक देखील थांबली आहे. दरम्यान हंगाम २०२३ २४ मध्ये दि मार्केटिंग फेडरेशन ने सुशिक्षित बेरोजगार संस्थांना धान खरेदी करण्याकरीता २० लक्ष रूपये अनामत रक्कम (DD) व १ कोटी रूपयांची बँक गॅरंटी (FDR) मागवून जाचक अटी लावल्या आहेत. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार संस्थांना ह्या अटी न झेपणाऱ्या असून, यामुळे अनेक संस्था बंद पडून कामाला लागलेले सुशिक्षित बेरोजगार होणार आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना देखील बसणार असून, धानाची विक्री करतांना शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे. धान खरेदी रखडण्याची स्थिती येऊ नये. यासाठी हंगाम २०२३-२४ मध्ये विना लावलेल्या जाचक अटी रद्द करून १० लक्ष रूपये अनामत रक्कम (DD) व ५० लक्ष रूपयांची बँक गॅरंटी (FDR) ठेवावी.अशी रास्त मागणी दिलेल्या पत्रकात माजी आमदार राजेश (बाळा) काशिवार यांनी केली आहे.