आमदार डॉ. परीणय फुके यांचे हस्ते नव्या बसेसचा लोकार्पण सोहळा संपन्न

116

🛑 साकोली आगारात नवीन बसेसचे आमदार डॉ. परीणय फुके यांचे हस्ते लोकार्पण •

🛑 १० बसेस पैकी ६ आगारात दाखल : रापमंचे अधिकारीही उपस्थित •

🔘 साकोली / महाराष्ट्र
रिपोर्ट : आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

🔳 साकोली : भंडारा गोंदिया जिल्ह्यातील मध्यवर्ती आगार म्हणून साकोली आगार हे मुख्य समजले जाते. आणि या मध्यवर्ती आगारात नविन दहा हिरकणी ( मिनी एशियाड ) बसेसची प्रवाशांना सोयीस्कर व्हावे यासाठी साकोली आगारात सदर बसेस आवश्यक होत्या आणि हेच विशेष प्रयत्नाने करून दाखविले आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. परीणय फुके यांनी सहा नविन बसेसच्या लोकार्पण सोहळ्यात बोलतांना केले. याप्रसंगी रापमंचे अधिकारीही हजर होते.

🔳 साकोली आगारात सध्या १० अश्या बसेस देण्यात आल्या असून सहा बसेस प्रवाशांना सेवा देत आहेत. या नविन “हिरकणी” बसेसचा लोकार्पण सोहळा भंडारा गोंदिया वि.प.स. आमदार डॉ. परीणय फुके यांचे हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुध्दे, रा.प.मं. वाहतूक अभियंता महेंद्र नेवारे, आगार व्यवस्थापक सचिन आगरकर, जिपस वनिता डोये, माहेश्वरी नेवारे, भाजपा ता. अध्यक्ष प्रा. अमोल हलमारे, शहराध्यक्ष नितीन खेडीकर, सेंदूरवाफा अध्यक्ष शंकर हातझाडे, महिला मोर्चाचे रेखा भाजीपाले, उषा डोंगरवार, डॉ. नेपाल रंगारी, लखन बर्वे, रजनी करंजेकर, धनवंत राऊत, निशा इसापुरे, माजी नगरसेवक ॲड. मनिष कापगते, रवी परशुरामकर, नरेंद्र वाडीभस्मे, किशोर पोगळे, डाकराम कापगते, आनंद सोनवाने, प्रेमकुमार गहाणे, सरपंच पुरूषोत्तम रूखमोडे, मधूकर कापगते, अमोल टेंभुर्णे, स्वीय सहा. दिवाकर मने यांसह साकोली बसस्थानक येथील सर्व चालक वाहक आणि प्रवाशी याप्रसंगी उपस्थित होते. लोकार्पण सोहळ्यात संचालन भाजपा महामंत्री प्रदीप गोमासे यांनी केले. येथे आमदार डॉ. परीणय फुके यांनी बसस्थानक येथून नविन बस साकोली – माहूर ला हिरवी झंडी दाखवित प्रवाशांसह बस प्रवासाला रवाना झाली.

Warring • 

🚫 Do not Copy this Global Maharashtra & Sakoli Media News.