
⛔ नागपूरात साकोली जिल्हा परिषद हायस्कूलने पुन्हा मारली बाजी •
🔘 लोकसंख्या शिक्षण विभागस्तरीय भूमिका अभिनय स्पर्धेत ठरली तृतीय •
📕 नागपूर / महाराष्ट्र
TUE. 24. 10. 2023
रिपोर्ट : अनूप यादव • संपादक • ग्लोबल महाराष्ट्र न्यूज
🔳 नागपूर : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रवीनगर नागपूर येथे आयोजित लोकसंख्या शिक्षण विषयक विभाग स्तरीय भूमिका अभिनय व लोक नृत्य स्पर्धेत जिल्हा परिषद हायस्कूल साकोली जि. भंडारा येथील विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.
🔳 लोकसंख्या शिक्षण विषयक अंतर्गत व्यसनाचे दुष्परिणाम या विषयावर सहा मिनिटाचे सादरीकरण केले. विषयाची मांडणी उत्कृष्ट अभिनयासाठी शाळेचे विद्यार्थी रिद्देश देशमुख, आदित्य नंदेश्वर, दादाजी लांजेवार, सुशील कटरे व तनुज कठाने यांनी रोख पारितोषिक प्रशस्ती प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. शाळेतर्फे मुख्याध्यापक धर्मेंद्र कोचे सहभागी विद्यार्थी शिक्षिका मार्गदर्शिका कु. प्रतिभा पडोळे तसेच अजय घरडे सर यांचे विशेष मार्गदर्शन व कौतुक करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे शिक्षक बि.आर चव्हाण, कल्पना अतकरी, धनराज मसराम, मनोहर भैसारे, सय्यद, अजय डोये, सुबोध बोरकर, गिरीश सोनवणे, कु. लंजे, चाचेरे, चौधरी, इमरान तुरक, दिग्विजय चांदेवार व मनीषा खुणे याप्रसंगी उपस्थित होते. तर पुन्हा उपराजधानी नागपूरात साकोली जिल्हा परिषद हायस्कूलने यश संपादन केल्याबद्दल उसगांव/चांदोरी येथील ताजश्री बहुउद्देशीय ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हार्दिप ठवरे, उपाध्यक्ष पुंजाराम कुटारे व संस्थेद्वारे या हायस्कूलचे अभिनंदन करून सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकवृंदांना धम्मचक्र प्रवर्तन दिन व दसरानिमित्त हार्दिक शुभेच्छा देत मुलांचा गौरव केला आहे हे उल्लेखनीय.
[ संकलन • आशिष चेडगे प्रतिनिधी ग्लोबल महाराष्ट्र न्यूज मिडीया नेटवर्क ]



