
भद्रावती मध्ये प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव 10 फेब्रुवारीला.
मंगेश बुरडकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या महोत्सवात समाज बांधवानी एकत्र येण्याचे आवाहन.
जिला प्रतिनिधी: विश्वकर्मा जयंती
सविस्तर बातमी :- सष्टीचा सृजनकर्ता म्हणून विश्वकर्माकडे पाहिले जाते. शास्त्रांमध्ये विश्वकर्मा यांचा जन्म भाद्रपद वद्य संक्रांतीला झाला होता, असे म्हटले आहे. परंतु, देशभरात यामध्ये मतभिन्नता आढळते. सृष्टीचा सृजनकर्ता म्हणून विश्वकर्माकडे पाहिले जाते. शास्त्रांमध्ये विश्वकर्मा यांचा जन्म भाद्रपद वद्य संक्रांतीला झाला होता, असे म्हटले आहे. परंतु, देशभरात यामध्ये मतभिन्नता आढळते. देशातील काही ठिकाणी दिवाळीत, तर काही ठिकाणी माघ महिन्यात विश्वकर्मा जयंती साजरी केली जाते. मात्र, बहुतांश ठिकाणी भाद्रपद वद्य संक्रांतीला विश्वकर्मा पूजनाची परंपरा सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. सृष्टीच्या प्रारंभी केवळ विश्वकर्मा अस्तित्वात होता. समस्त प्राणीसृष्टीचा विश्वकर्मा जनक मानला गेला आहे. एक वैदिक देवता असा उल्लेखही काही ठिकाणी आढळतो. पुराणे व महाभारत यात विश्वकर्मांना देवांचा महान शिल्पशास्त्रज्ञ मानले आहे. ब्रह्मांच्या इच्छेनुसार विश्वकर्मांनी नवीन औजारे शोधलीत. सौर उर्जा वापरण्याचे व त्या उर्जेच्या नियंत्रणाचे ज्ञान त्यांना प्राप्त होते. सूर्य शक्तिचा वापर करून त्यांनी विष्णू, शिव व इंद्रासाठी अनुक्रमे सुदर्शन चक्र, त्रिशूळ व विजय रथ निर्माण केला. ते हरहुन्नरी होते. शस्त्रे व अस्त्रे, अलंकार, पुष्पक विमान आदींची निर्मिती त्यांनी केली. हजारो यंत्र-तंत्र, शस्त्रास्त्रे व साधनांची त्यांनी निर्मिती केली. सोनार, लोहार, सुतार, कुंभार, कासार समाजबांधव त्यांना आपले दैवत मानतात. कलियुगातही विश्वकर्मा यांचे पूजन अत्यंत लाभदायक मानले गेले आहे. जाणून घेऊया. विश्वकर्मांनी इंद्रासाठी इंद्रलोक, सुतलनामक पाताळलोक, श्रीकृष्णासाठी द्वारका नगरी, वृंदावन, राक्षसांसाठी लंका तसेच पांडवांसाठी हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थ, गरूड भवन आदींची निर्मिती केली. विश्वकर्मा यांनी श्रीरामांना सहकार्य केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच महाबली हनुमान, विश्वकर्मा पुत्र नल व नील यांनी रामसेतू बांधला. विश्वकर्मा यांनी १४ ब्रम्हांडाची रचना केली. त्यात वायुमंडळ, कैलास, वैकुंठ, ब्रम्हपुरी, इंद्रपुरी, स्वर्ग, पृथ्वी, पाताळातील नागलोक आदींची रचना केली. याशिवाय जगन्नाथ पुरी येथील भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती, लंका, श्रीकृष्णांची द्वारका अशा अनेकविध दिव्य वास्तूंची निर्मिती विश्वकर्मांनी केली होती, असे सांगितले जाते. 🌲
असे प्रभू विश्वकर्मा यांच्या जयंती निमित्य भारतात सर्वत्र उत्सव साजरा केला जातो, असाच एक मोठा उत्सव भद्रावती तेथे दिनांक 10 फेब्रुवारी रोज सोमवारला साजरा केला जात असून मंगेश बुरडकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या महोत्सवात समाज बांधवानी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समाज संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
प्रभू विश्वकर्मा जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी भद्रावती येथे नुकतीच बैठक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली असून कुणाकडे काय जबाबदारी आहे याविषयी नियोजन करण्यात आलें यावेळी संघटनेचे अध्यक्ष मंगेश बुरडकर, उपाध्यक्षा सौ. तेजस्वी निवलकर, सचिव मंगेश अंड्रसकर, सहसचिव मनोज बुरडकर तर कोषाध्यक्ष दीपाली बोरीकर उपस्थित होते.



