माढेळी येथील हॉटेल विशाल रेस्टॉरंट अँड बार चे लायसन्स रद्द कर.

67

माढेळी येथील हॉटेल विशाल रेस्टॉरंट अँड बार चे लायसन्स रद्द कर.

अनुपम बहुउद्देशीय संस्थेची जिल्हाधिकारी यांच्यासह एसआयटी चौकशी प्रमुख अप्पर पोलीस आयुक्तसंदीप दिवाण यांच्याकडे मागणी.


चंद्रपूर/महाराष्ट्र
15 | MAY |  2025
संपादक: अनुप यादव ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

सविस्तर बातमी :- राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेकायदेशीरपणे जिल्ह्यात शेकडो बिअर बार, बिअर शॉपी व देशी दारूसह वाईन शॉपी परवाने स्थांनंतरण करून कोट्यावधी रुपयाची उलाढाल केली, दरम्यान या संदर्भात अनेक तक्रारी करण्यात आल्या व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांना 1लाखाची लाच घेतांना त्यांच्या दोन अधिकाऱ्यांना रंगेहात अटक केली होती व या प्रकरणी तत्कालीन पालकमंत्री यांनी शासनाला या व्यवहाराची चौकशी काण्यासाठी एसआयटी चौकशी ची मागणी केल्याने ती चौकशी राज्याचे एसीबी अप्पर पोलीस आयुक्त संदीप दिवाण यांच्या अध्यक्षतेखाली एआयटी चौकशी सुरु करण्यात आली, मात्र वरोरा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक थोरात ज्यांनी स्वतः अनेक दारू परवाने संदर्भात दोषी असतांना त्यांनी माढेळी येथील हॉटेल विशाल रेस्टॉरंट अँड बारला परवानगी बाबत शिफारस केली आणि तो परवाना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देण्यात आला, त्यामुळे याबाबत अनुपम बहुउदद्देशीय संस्थे द्वारे जिल्हाधिकारी यांच्यासह एसआयटी चौकशी प्रमुख अप्पर पोलीस आयुक्त संदीप दिवाण यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहें.

चंद्रपूर जिल्ह्यात अगोदरचं तत्कालीन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांनी बेकायदेशीर बिअर बार, बिअर शॉपी, देशी दारू दुकानाचे व वाईन शॉपी चे ट्रान्सफर पैसे घेऊन दिले असल्याचा ठपका ठेऊन राज्य शासनाने त्या सर्व बेकायदेशीर दिलेल्या परवाने संबधात एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहें, व राज्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त संदीप दिवाण यांनी नुकतेच चंद्रपूर जिल्ह्यात दौरा करून अनेक तक्रारीची नोंद करून घेतली व आक्षेप अर्ज स्वीकारले आहें, त्या संबंधाने येणाऱ्या काही दिवसात चौकशी झाल्यावर अनेक परवाने रद्द होणार आहें, मात्र वरोरा तालुक्यातील माढेळी या गावात साधी पार्किंग ची जागा नसताना हॉटेल विशाल रेस्टॉरंट अँड बार ला परवाना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक थोरात यांच्या शिफारसीने मंजूर करण्यात आला आहें जो बेकायदेशीर असल्याचे तक्रारीत नमूद आहें.

सगळे नियम धाब्यावर?

कुठल्याही व्यक्तीला बिअर बार टाकायचा असेल तर त्या व्यक्तीला किमान एक वर्षांपूर्वी रेस्टॉरंट सुरु करणे आवश्यक असतें, त्यात पार्किंग ची व्यवस्था, स्टोर रूम, किचन रूम ची व्यवस्था सुद्धा असणे आवश्यक आहें पण अशी कुठलीही व्यवस्था नसताना मागील वर्षभरापासून बेकायदेशीर दारू परवाने पैसे घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिले असल्याचे आरोप असताना पुन्हा हॉटेल विशाल रेस्टॉरंट अँड बार ला परवानगी दिली आहें जी बेकायदेशीर असून हा परवाना त्वरित रद्द करण्याची मागणी माढेळी गावातील नागरिक करत आहें परंतु कुणी समोर येऊन तक्रार करायला तयार नसल्याने अनुपम बहुउद्देशीय संस्थेद्वारे निवेदन करण्यात आले आहें, दरम्यान या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून या बिअर बार चा परवाना रद्द करावा अन्यथा गावकरी यांना घेऊन वरोरा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा संस्थेचे अध्यक्ष अनुप यादव यांनी प्रशासनाला दिला आहें.