भद्रावती कृ उ बा समितीचे माजी सभापती वासुदेव ठाकरे होणार तडीपार?

91

भद्रावती कृ उ बा समितीचे माजी सभापती वासुदेव ठाकरे होणार तडीपार?

अनुपम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे केलेल्या मागणीवर शिक्कामोर्तब?

भद्रावती/चंद्रपूर:-

सविस्तर बातमी :- भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वासुदेव उर्फ वासु हनुमान ठाकरे हे मूळचे भद्रावती तालुक्यातील चिरादेवी या गावाचे रहिवाशी असून त्यांचा विटभट्टी चा व रेतीचा व्यवसाय आहें, दरम्यान त्यांचेवर कोराना काळात सन २०२०-२१ च्या दरम्यान कोट्यावधीचा रेती साठा केल्याप्रकरणी व रेती चोरी प्रकरणी तत्कालीन उपविभागीय अधिकारी शिंदे व उपविभागीय पोलीस अधिकारी पांडे यांनी कोट्यावधी चा दंड आकारून व गुन्हे दाखल करून त्यांचे ट्रक ट्रॅक्टर व जेसीबी जप्तीची कारवाई केली होती, वासुदेव ठाकरे यांच्यावर रेती चोरी प्रकरणी अनेक गुन्हे असतांना आता त्यांच्यावर भद्रावती पोलीस स्टेशनं येथे कलम ३०८(२), ३९६, ३५१(२), ३(५) अन्वये दिनांक १७/६/२०२५ ला गुन्हे दाखल झाले असल्याने त्यांचेवर तडीपारीची कारवाई करावी अशी मागणी अनुपम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे केल्यानंतर आता त्या मागणीवर शिक्कामोर्तब होऊन वासुदेव ठाकरे तडीपार होईल असे संकेत पोलीस विभागाने दिले आहें.

 

वासुदेव ठाकरे यांनी काही महिन्यापूर्वी निप्पान अँड डेंड्रो कंपनी च्या जागेवर उद्योग उभारला जात असतांना कंपनी च्या लोकांना मारहान केल्या प्रकरणी त्यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल झाले असून या संदर्भात केस क्रमांक ०८/२०२५ अन्वये त्यांना हद्दपार करण्याची कारवाई प्रस्तावित होती, ती उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांच्याकडे चौकशी करिता प्रलंबित आहे. दरम्यान वासुदेव ठाकरे यांचा रेतीचा व्यवसाय असून तो लपून छपून रेती चोरी करतो, त्यांच्या सोबत काही राजकीय पदाधिकारी समर्थनार्थ असल्यानेते रेती घाट धाराकांना धमाकावून स्वतःच्या ट्रक ट्रॅक्टर द्वारे रेतीचा उपसा करण्यासाठी दादागिरी त्यानी केली असता त्यांचेवर गुन्हे दाखल झाले आहे, त्यामुळे पोलीस अधिक्षक, चंद्रपूर यांचे पत्र क. स्थागुशा/एमओबी/हद्दपार प्रस्ताव/२०२५/५६९ दिनांक २१/२/२०२५ नुसार पोलीस स्टेशन अधिकारी, भद्रावती यांचे प्रस्ताव क. १/२०२५ महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ५६ (१) (अ) (ब) नुसार वासुदेव उर्फ वासु हनुमान ठाकरे, रा. चिरादेवी ता. भद्रावती जि. चंद्रपूर यांचा हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलीस विभागाच्या हातात असून तो उपविभागीय अधिकारी वरोरा यांचेकडे जाऊन त्यावर लवकरच तडीपार करण्याची कारवाई होईल असे सांगण्यात येत आहें.