६५ मेगावॉट सोलार प्रकल्पात हल्ला! शिवसेना (उद्धव ठाकरे गट) कार्यकर्त्यांकडून कामगारांवर गंभीर मारहाण.?

64
६५ मेगावॉट सोलार प्रकल्पात हल्ला!
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) कार्यकर्त्यांकडून कामगारांवर गंभीर मारहाण?
चंद्रपूर | 05 नोव्हेंबर 2025
संपादक | अनुप यादव ग्लोबल महाराष्ट्र न्यूज 
सविस्तर घटना:– महाजेनकोच्या चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन परिसरात भारत विकास ग्रुप, पुणे यांच्या मार्फत उभारण्यात येत असलेल्या ६५ मेगावॅट सोलार प्रकल्पात दि 04 नवेम्बर दुपारी गंभीर तणाव निर्माण झाला. स्थानिक राजकीय गटातील काही व्यक्तींनी प्रकल्पातील कामगारांवर अचानक हल्ला केल्याची माहिती सुत्रांनी दिलेली आहे..
सोलार प्रकल्पाचे काम लखमापूर गावाजवळ ईरई नदी परिसरात सुरू आहे. या ठिकाणी प्रकल्प सुरू झाल्यापासून काही स्थानिक व्यक्ती काम मिळवण्याच्या मागणीवरून कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे येत असल्याचे समजते.
 दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाशी संबंधित असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या सुमित अग्रवाल, विक्की बावरे, बाळू भगत यांच्यासह सुमारे ५० जणांच्या गटाने प्रकल्प स्थळी अचानक धडक मारली.
सदर गटाने प्रकल्पावर कार्यरत कामगारांना धमकावत गंभीर मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे.
हल्ल्यात काही कामगारांचे:
हात मोडले, डोक्यात जखम, इतर शारीरिक दुखापती असे प्रकार घडल्याचे सुत्रांकडून समजते.
हे कामगार इतर राज्यातून कामानिमित्त आलेले असून, त्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे?
घटनेनंतर प्रकल्पाचे काम काही काळासाठी पूर्णपणे बंद करण्यात आले.
भारत विकास ग्रुपकडून स्थानिक पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.
स्थानिक पातळीवर व कामगार संघटनांकडून मागणी:
दोषींवर कठोर गुन्हे दाखल करून अटक करावी
प्रकल्प परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवावा
कामगारांची सुरक्षा सुनिश्चित करावी
या घटनेमुळे सोलार प्रकल्पाच्या कामातील वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सर्व स्तरातून जोर धरत आहे.