पत्रकार संजीव भांबोरे विश्वविभुषण डॉ .बाबासाहेब आंबेडकर ज्येष्ठ पत्रकार (प्रिंट मीडिया) पुरस्काराने पंढरपुरात सन्मानित

94

पत्रकार संजीव भांबोरे विश्वविभुषण डॉ .बाबासाहेब आंबेडकर ज्येष्ठ पत्रकार (प्रिंट मीडिया) पुरस्काराने पंढरपुरात सन्मानित

१४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रमात पुरस्कार सोहळा संपन्न

साकोली / महाराष्ट्र
15/04/2023
रिपोर्ट • आशिष चेडगे | संवाददाता ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

सविस्तर बातमी – साकोली : महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त विश्वभूषण डॉ .बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान पंढरपूर जि. सोलापूर वतीने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांना विश्वविभुषण डॉ बाबासाहेब आंबेडकर ज्येष्ठ पत्रकार ( प्रिंट मिडीया ) २०२३ – २४ चा राज्यस्तरीय पुरस्काराने विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे औचित्य साधून राज्यस्तरीय ज्येष्ठ पत्रकार( प्रिंट मीडिया) पुरस्कार प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ .बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या वतीने १४ एप्रिल ला जयंती दिनी – शिवतिर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक, पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे ह .भ. प .गहनीनाथ औसेकर महाराज विठ्ठल रुक्मिणी मंदिर सहअध्यक्ष यांच्या हस्ते देण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिजीत लक्ष्मण ढोबळे चेअरमन महात्मा फुले अनुसूचित जाती जमाती सहकारी सूतगिरणी वाघोली होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रशांत मालक परिचालक विधान परिषद सदस्य, आमदार समाधान दादा आवतोडे विधानसभा सदस्य, शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, अभिजीत पाटील चेअरमन विठ्ठल सहकारी साखर कारखाना, अनिल सावंत वाईस चेअरमन भैरवनाथ शुगर, पी बी रोंगे अध्यक्ष विठ्ठल एज्युकेशन सोसायटी, कल्याणराव काळे चेअरमन, उज्वला हाके प्रदेश अध्यक्ष भाजपा विमुक्त भटक्या जाती, अजय कुमार सर्वगोड कार्यकारी अभियंता ,नागेश भोसले चेअरमन मर्चंट बँक पंढरपूर, प्रभाकर देशमुख अध्यक्ष जनहित शेतकरी संघटना, नवनाथ पापरकर माजी नगराध्यक्ष पंढरपूर ,अँड दत्तात्रय खडतरे ग्रामीण विकास तज्ञ ,नानासाहेब कदम शिवप्रेमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक डी राज सर्वगोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष भाई नितीन काळे ,प्रतिष्ठानचे सचिव अनिल ननवरे ,उत्सव समितीचे सचिव विलास जगधने , या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय ज्येष्ठ पत्रकार प्रिंट मीडिया पुरस्कार प्रदान करण्यात आला . प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांना हा २०२३ – २०२४ महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार प्रिंट मिडीया मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, औरंगाबाद ग्रामीण अध्यक्ष सतीश लोखंडे, अकोला जिल्हा अध्यक्ष डॉ चव्हाण, भंडारा जिल्हा अध्यक्ष आशिष चेडगे, दैनिक शिल्पकार चे मुख्य संपादक भूषण मोरे, दैनिक दंडाधिकार चे मुख्य संपादक अर्जुन जाधव, दैनिक तुफान क्रांतीचे संपादक मिर्झागालिब रज्जाक मुजावर, सक्षम पोलिस टाईम चे मुख्य संपादक विलास पाटील, बहुजन न्यूज चॅनलचे मुख्य संपादक खेमचंद मेश्राम, विदर्भ वीर चे मुख्य संपादक गौतम धोटे, जनता की आवाज चे मुख्य संपादक श्रीकृष्ण देशभ्रतार, दैनिक देशोन्नतीचे पत्रकार प्राध्यापक प्रेमानंद हटवार, जितेंद्र गाडेकर जालना जिल्हाध्यक्ष प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, ग्लोबल महाराष्ट्र न्यूज संपादक अनूप यादव, लहुजी शिंदे लातूर जिल्हा अध्यक्ष प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.