📡 साकोली / महाराष्ट्र दि. 09. 06. 2023 रिपोर्ट : आशिष चेडगे उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज
सविस्तर बातमी : साकोली : विद्यार्थ्यांनो अगोदर शिक्षण हे तुमच्या पुढील भविष्यातील सर्वात मोठे वाघिणीचे दूध आहे. आपण सर्वोच्च तंत्रज्ञान कॉम्प्युटराईज्ड शिक्षणात सामोरे जावे व आपल्याला शिक्षणासाठी कुठलीही मदत लागली तर मला निःसंकोचपणे हाक द्या असे प्रेरणात्मक प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी सन २०२२ – २३ मध्ये शालांत परीक्षा व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यात आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.
या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी आमदार नाना पटोले यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना संबोधित केले. शालेय शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं असतं, कुठल्याही व्यवसायाचा किंवा उच्च शिक्षणाचा पाया हा शालेय शिक्षणात असतो. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात करिअरचा मार्ग निवडा मात्र शालेय परीक्षेला देखील तेवढ्याच जिद्दीने सामोरे जा, यूपीएससी- एमपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून चांगले अधिकारी बना, चांगले नागरिक बना आणि भविष्यात कधीही कुठलीही मदत लागली तर मला हाक द्या, असे प्रेरणादायी प्रतिपादन आ. नाना पटोले यांनी यावेळी बोलताना केले. याप्रसंगी भंडारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहन पंचभाई, जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी, वैद्यकीय अधिक्षक डॉ.संदीपकूमार गजभिये, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशांत सिंह, जि.प. सभापती मदन रामटेके, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. अशोक कापगते, साकोली शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष दिलीप मासुरकर, पंचायत समिती सभापती गणेश आदे, महिला शहर काँग्रेस अध्यक्षा पुष्पा कापगते तसेच शिक्षणाधिकारी व्हि. एम. कोरे व अन्य अधिकारी उपस्थित होते. सत्कार सोहळ्यात संचालन दिलीप मासूरकर यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. अशोक कापगते यांनी केले. सरतेशेवटी जिल्हा परिषद सदस्या शितल राऊत यांनी सर्वांचे आभार मानले. सत्कार सोहळ्यात माजी जिपस छाया ब्राह्मणकर, पंसस अर्चना इळपाते, माधुरी रासेकर, शालू नंदेश्वर, युवक काँग्रेसचे ओम गायकवाड, विनायक देशमुख, सोनू बैरागी, उमेश भुरे, जावेद शेख, लिलाधर पटले, नयन पटेल, सरपंच नंदू कावळे, आमदार प्रतिनिधी हरगोविंद भेंडारकर, केकेसी तालुका अध्यक्ष आदित्य चेडगे, स्वीय सहायक उमेश भेंडारकर, मिडीया प्रमुख आनंद नागोसे, स्वीय सहायक नेपाल कापगते, विक्की राऊत, प्रकाश कुरंजेकर, रमेश घरडे आणि सर्व कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.