“साकोली जागृत मिडीया क्लब” नवी कार्यकारिणी जाहीर

103

🛑” जागृत मिडीया क्लब” साकोली नविन कार्यकारीणी झाली जाहीर

🛑मनिषाताई काशिवार यांना प्रथमच महिला अध्यक्षपदाचा मान

📕 साकोली / महाराष्ट्र
TUE – 13. 06. 2023
रिपोर्ट • आशिष चेडगे – उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

📕 सविस्तर बातमी • साकोली : जनतेला झटपट अपडेट मिळवण्यासाठी आज डिजिटल मिडीयाला प्रथम स्थान दिले आहे. साकोलीत आता नविन “साकोली जागृत मिडीया क्लब” या संघाची नुकतीच ११ जून २०२३ ला नव्याने स्थापना करण्यात आली असून संघाच्या मनिषाताई काशिवार यांना प्रथमच महिला अध्यक्षपद सर्वानुमते मंजूर होऊन निवड करण्यात आली आहे.
सदर नविन “साकोली जागृत मिडीया क्लब” संघात अध्यक्ष मनिषाताई काशिवार – सकाळ / पब्लिक मिडीया, उपाध्यक्ष रवि भोंगाणे – सहसंपादक सा. आकाशतरंग, सचिव आशिष चेडगे – दै.युवाराष्ट्र दर्शन / ग्लोबल महाराष्ट्र न्यूज, सहसचिव डि.जी. रंगारी – देशोन्नती / संपादक एशियन न्यूज, कोषाध्यक्ष किशोर रंगारी – दैनिक नवराष्ट्र, प्रसिद्धी प्रमुख ताराचंद कापगते – देशोन्नती, सदस्यगणात ऋग्वेद येवले – पुण्यनगरी / दखल भारत, निलय झोडे – दखल भारत, शैलेश मोटघरे – दैनिक नवराष्ट्र, किशोर बावणे – पुरोगामी डिजिटल न्यूज, शेखर इसापुरे – दखल भारत, यशवंत कापगते – महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, अनिल जगीया – राष्ट्र पत्रिका अशी नविन साकोली जागृत मिडीया संघाची कार्यकारिणी असून सर्व साकोली तालुक्यातील व शहरातील जनतेने या नविन संघातील पदाधिकारी व सदस्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.