📕नागझिरा रोडवर पक्के अतिक्रमण कार्यक्रमांचा झाला शुभारंभ.!
📕दोन्ही बाजूला वाहतूक अडचणीत ; जनता विचारू लागली शासनाचे तर लक्षच नाही पण पत्रकारही झोपले काय..?
◾ साकोली / महाराष्ट्र MON. 19. 06. 2023 रिपोर्ट • आशिष चेडगे उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज
🔳 सविस्तर बातमी • साकोली : शहरातील नागझिरा वन्यजीव अभयारण्य या मुख्य व शालेय वाहतुकीच्या मार्गावर आता पक्के अतिक्रमणांचा शुभारंभ सोहळा नुकताच पार पडला आहे. यावर परीसरातील जनता काही प्रेस प्रतिनिधींना प्रश्न विचारतात की या संतापजनक प्रकारावर येथील प्रशासन तर काहीच लक्ष देत नसून पार झोपलेली आहे पण येथील तुम्ही पत्रकारही झोपले काय.? असा संतापजनक सवाल जनता आज सर्वत्र बोलत आहे. कारण या मार्गावर आता एक गाडी उभी असतांनाच दूसरी गाडी क्रॉसिंग होत नसून संपूर्ण वाहतूकीचा खोळंबा निर्माण होतो यावर आता लोकशाहीच्या चौथ्या स्तंभानीच पुढाकार घेऊन झोपलेल्या शासनाला उठविण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणीही जनतेने केली आहे.
🔳 नागझिरा अभयारण्य रोडावर विविध शिक्षण संस्थेचे महाविद्यालये व शाळा असून हा रोड मुख्य आवागमनिय आहे. परंतू काही दिवसांपासून तर मुख्य चौकापासूनच पक्के बांधकाम करीत अतिक्रमणांचा शुभारंभही करून टाकला आहे. अगदी रस्त्याच्या जवळजवळच अतिक्रमण धारकांनी पक्कं बांधकाम करून रोडवरच वाहतूकीस अडचण निर्माण करून ठेवली आहे. के के. हायस्कूल बाजूला तर काहींनी हळूहळू समोर सिमेंटचे बांधकाम सरकवित रोडापासून फक्त दोन मीटरच शोल्डरवर जागा ठेवली आहे. नागझिरा रोड ते वैनगंगा शैक्षणिक परीसर पुलिया पर्यंतची तर अगदी दयनिय अवस्था असून जणू रोडटच शॉपिंग कॉम्प्लेक्सचे निर्माणही केलेले आहे. पण आता नुकतीच ३० जूनपासून शाळेची पहिली घंटा शुक्रवार वाजणार आणि नियमितपणे शाळा महाविद्यालये सुरू होत आहेत. या परीसरात अश्या वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन आणि अवैधरित्या अतिक्रमणांमुळे गजबजलेल्या रोडवर शाळकरी विद्यार्थ्यांसोबत अपघात होऊन जीवघेणा प्रकार झाला तर याला सर्वस्वी जबाबदार कोण राहणार असाही आरोप जनतेने केला आहे. यावर झोपलेल्या प्रशासनाने अतितातडीने या गंभीर समस्येकडे लक्ष घालून तातडीने उपाययोजना करावीत अन्यथा या शैक्षणिक परीसरातील रोडवर अपघातात कुणाचा जीव गेला तर संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असा ही सवाल नागरीकांनी उपस्थित केला आहे.