
⛔ ब्रिटिशकालीन जि.प. शाळेत गुरूपौर्णिमा – शाळा पूर्वतयारी मेळावा
◾ साकोली / महाराष्ट्र
MON. 03. 07. 2023
रिपोर्ट – आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज
🔳 सविस्तर बातमी – साकोली [ ०३ जुलै ] :
शहरातील सर्वात जूनी १८६० पूर्वी स्थापित ( जनपद ) जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा क्रं ०१ ( सेमी इंग्लिश ) गणेश वार्ड येथील शाळेत गुरूपौर्णिमा व शाळा पूर्वतयारी मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी इयत्ता १ लीच्या विद्यार्थ्यांशी नविन शिक्षकांनी अभ्यासक्रमांविषयी मनमोकळेपणाने संवाद साधला हे विशेष.
🔳 व्यासपुजा गुरूपौर्णिमा निमित्त आयोजित सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी शिक्षण विस्तार अधिकारी एच. एस. भलावी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश कोवे, उपाध्यक्ष लिना चचाने, मुख्याध्यापक डि. डी. वलथरे, सदस्य हेमंत भारद्वाज, अमित लांजेवार, सचिन राऊत, सौ. गजापुरे, आशिष चेडगे, सुहास बंबार्डे आदी उपस्थित होते. येथे शाळा पूर्वतयारी मेळावा प्रसंगी नविन प्रवेश इयत्ता १ ली च्या विद्यार्थ्यांशी नविन शिक्षकांनी विविध अभ्यासक्रमांविषयी विविध मार्गदर्शन स्टॉल लाऊन मनमोकळेपणाने संवाद साधला यात वेगवेगळ्या चित्रांतून व्यक्ती, प्राणी, फळे, साधने, अंकगणित, साहित्य, परीसर, घडामोडी अचूक ओळखणे यांविषयी मुलांकडून माहिती घेऊन त्यांची बौध्दिक क्षमता तपासली व सर्वांना पाठ्य प्रमाणपत्रही दिले. या शाळेत एकुण २२७ विद्यार्थी पटसंख्या असून कार्यक्रमात पालकही आवर्जून उपस्थित झाले होते. गुरूपौर्णिमा व शाळा पूर्वतयारी मेळाव्यात संचालन टि. आय. पटले यांनी केले. यावेळी सर्व शिक्षकवृंद आर. आर. बांगरे, एम. व्ही. बोकडे, बलविर राऊत, शालिनी राऊत, कार्तिक साखरे यांनी मेळावा यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले.



