📕 दोन महिला व तीन जणांना केले भंडारा रूग्णालयात तातडीने दाखल
◾ साकोली / महाराष्ट्र Tue – 04. 07. 2023 रिपोर्ट : आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज
🔳 सविस्तर बातमी || साकोली : तिरोडा जिल्हा गोंदिया येथून साकोलीमार्गे प्रतापगड येथे दर्शनासाठी जाणा-या भाविकांची टाटा सुमो मंगळवार ०४ जुलै स. ०९:३० दरम्यान साकोली जवळील शिवणीबांध येथील यु टर्न वळणावर उलटली. यातील एकुण सातही प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले असून त्यातील ०२ महिला आणि ०३ जणांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात आले तर दोन जखमी रूग्णांचा उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे उपचार सुरू असून पोलीसांनी सदर घटनेची नोंद करून पंचनामा केला आहे.
🔳 सविस्तर की टाटा सुमो क्र. एमएच २८ व्ही ०५०४ नी मु.पो. मनोरा ता. तिरोडा जिल्हा गोंदिया येथून दोन परीवारातील शुभम देवेंद्र खेडीकर ३५, राजकूमार चिमण मेश्राम ५२, नागेश देवेंद्र खेडीकर ३०, गजानन बाबूराव मेश्राम ३०, बबीता राजकूमार मेश्राम २८, कविता गजानन मेश्राम २८ व निरूपा देवेंद्र खेडीकर ५३ सर्व राहणार मनोरा, तिरोडा जिल्हा गोंदिया निवासी असून प्रतापगड येथील दर्गावर दर्शनासाठी साकोली मार्गे जात होते. सकाळी ०९:३० सुमारास शिवणीबांध जलाशय मुख्य पुल समोरील यु टर्न वळणावर भरघाव जाणारी ही टाटा सुमो वळणांवर चार ते पाच पलटी घेत शेतशिवारात उलटली. यात सातही जण गंभीररीत्या जखमी झाले असून पोलीसांनी नागरीकांच्या मदतीने सर्व जखमींना स्थानिक उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे आणले. वैद्यकीय अधिक्षक डॉ. संदीपकूमार गजभिये यांच्या तात्काळ सुचनेने तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अति गंभीर दोन महिलांसह पाचही जणांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेशकूमार थोरात यांच्या मार्गदर्शनात साकोली पोलीस करीत आहेत.
🚫 Warning ⚠️ Do not Copy this News Global Maharashtra News Media.