🛑 त्या नराधम शिक्षकाला फाशीची शिक्षा द्या – भाजपा जिल्हा महिला मोर्चा
🛑 भाजपा जिल्हा महिला मोर्चातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन • प्रकरण दाबण्याचा प्रयत्नात “मॅनेज” व “ब्लॅकमेलींग” चर्चा
📡 साकोली / महाराष्ट्र Mon. 07. 08. 2023 रिपोर्ट : आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज
📕 साकोली : तालुक्यात एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकानी ९ वर्षीय मुलीशी शारीरिक अश्लील चाळे केल्याने मुलीच्या आजीने केलेल्या तक्रारीवरून साकोली पोलीसांनी पोस्को अंतर्गत शिक्षकाला ( ०६ ऑगस्ट ) ला अटक केली आहे. या संतापजनक प्रकारावर सोमवार ( ०७ ऑगस्ट ) ला भारतीय जनता महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा इंद्रायणी कापगते यांच्या नेतृत्वात साकोली पोलीस ठाणे येथे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देत “त्या” नराधम शिक्षकाला फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. तर दूसरीकडे सदर प्रकरणात “ब्लॅकमेलींग” चा आरोप जनतेत असून संतप्त प्रकरणी याचे पडसाद महाराष्ट्रात उमटतील असा इशारा भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा इंद्रायणी कापगते यांनी दिला असून याची सविस्तर व पारदर्शकता ठेऊन चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
📕 साकोली तालुक्यातील एका गावातील शिक्षकाने दि. ०४ ऑगस्टला शाळेत खेळ शिकवत असताना मुलीच्या नको असणाऱ्या शरीराच्या भागाला स्पर्श केला होता, मुलगी ओरडली, त्यानंतर मुलीने घरी जाऊन आजीला शाळेत घडलेली घटना सांगितली. एक महिन्यापूर्वी याच शिक्षकाने मुलीला शाळेच्या कार्यालयात एकटीला बोलवून अत्यंत घाणेरड्यारितीने शारीरिक अश्लील चाळे केले होते व पुन्हा दिनांक ०४ ला या घटनेची पुनरावृत्ती झाल्याने ०९ वर्षीय मुलीच्या आजीने साकोली पोलीस स्टेशनला ०५ ऑगस्टला रात्री उशिरापर्यंत या घटनेची तक्रार केल्याने शिक्षक देवराम लक्ष्मण पटले वय ५६ या शिक्षकावर कलम पोस्को अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. सदर संतापजनक प्रकारावर सोमवार ( ०७ ऑगस्ट ) ला साकोली पोलीस ठाणे येथे भाजपा महिला मोर्चा आघाडी जिल्हाध्यक्षा इंद्रायणी कापगते, माजी नगराध्यक्ष धनवंता राऊत, जमनापूर सरपंचा पूजा देशमुख, जिल्हा परिषद सदस्या माहेश्वरी नेवारे, वनिता डोये, सरपंचा घानोड आशा लाडे, उपसरपंचा उमरी भुमिता धकाते, महिला भाजपा शहराध्यक्षा निशा ईसापूरे, महिला भाजपा महामंत्री आशा शेंडे, शकुंतला गि-हेपुंजे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांना “त्या” नराधम शिक्षकाला फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा द्यावी अशी मागणी करीत निवेदन दिले. तर बोलतांना माजी नगराध्यक्षा धनवंता राऊत म्हणाले की आईवडील ज्या मुलींना शाळेत पाठवितात व त्या ९ वर्षीय चिमुकल्या मुलीला काहीच समजत नाही तिच्यासोबत शर्मसार करणा-या अश्लील कृत्यावर त्या आरोपी शिक्षकाला फाशीचीच शिक्षा द्यावी अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
📕 दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या संतप्त प्रकरणी आता नविनच जनचर्चा रंगू लागल्या आहेत. यात हे प्रकरण मागे घेण्यासाठी आमिष देऊ करून जनतेत आरोपांची ही खमंग चर्चा होत आहे. तर दूसरीकडे या सदर गावी या आधीही अश्याच “अश्लिल चाळे” प्रकरणात ब्लॅकमेलींग आरोप करीत शासकीय व भव्य पगार असणा-या शिक्षकांना “टारगेट” करीत असल्याचा जनतेत आरोप आणि खमंग चर्चा होत आहे. परंतू या संतप्त प्रकरणी भारतीय जनता महिला मोर्चा अतिशय आक्रमक भूमिकेत असून चिमुकल्या मुलीचे अश्लील चाळे प्रकरण हे पैशांनी दाबता कामा नये कारण असे झाल्यास यावरील महिला जनतेचा विश्वास राहणार नसून तसे झाल्यास भाजपा महिला आघाडीच्या वतीने या संतापजनक प्रकारणाचे पडसाद महाराष्ट्रात उमटतील. अश्या गंभीर विषयावर आरोपीवर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पक्ष महिला आघाडी मोर्चा जिल्हा भंडारा वतीने करण्यात आली आहे.