⛔ ही तर सर्वसामान्यांची लूटमार – प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले
🔘 साकोलीत जनसंवाद यात्रेत लोटला जनसागर • सभेत आ. नाना पटोले यांचा भाजपावर हल्लाबोल •
📡 साकोली / महाराष्ट्र रिपोर्ट : आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज
📕 साकोली : केंद्रासह महाराष्ट्र राज्यातील भाजपा सरकारने अगदी सामान्यातील गरीब माणसाचे कंबरडे मोडून ठेवले आहे. जिथे तिथे या ना त्या नावावर लूबाडणूक टैक्स लादणे, महागाईच्या वणव्यात सामान्य गोरगरीबांना लंगडे करून ठेवण्याचे कारस्थान केंद्रासह महाराष्ट्रात सुरू आहे. पण याचे शासनाला समोर भयानक परीणाम भोगावे लागतील व आता त्रस्त झालेली सर्वसामान्य जनताच भाजपाला धडा शिकविण्यासाठी जागृत झालेले आहेत असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष तथा साकोली आमदार नाना पटोले यांनी मंगळवारी साकोलीत जनसंवाद यात्रेत सभेला संबोधित करून थेट भाजपा सरकारवर हल्लाबोल केला.
📕 महाराष्ट्रात कॉंग्रेसची जनसंवाद यात्रेचे ( १२ सप्टेंबर ) ला साकोली शहरात आगमन झाले. ठिकठिकाणी प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले व यात्रेतील सहभागी पदाधिकार-यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. जूने पंचायत समिती छत्रपती चौकात जनसंवाद यात्रेच्या जाहीर सभेत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी यावेळी थेट भाजपा सरकारवर हल्लाबोल चढवित भाजपाच्या केंद्र व राज्य सरकारला सामान्य माणूस आज कसे आणीबाणीच्या जीवनातून संघर्ष करीत आहे याचे भाजपाला थोडेही भान नाही, खोटी शान दाखवून विकासाच्या नावावर विकलेल्या काही मिडीयातून जनणेपूढे नवटंकी डंका वाजविण्यात भाजपा पटाईत आहे पण शिक्षित व सामान्य गोरगरीब जनता यांच्या या नवटंकीला चांगलेच ओळखून घेतले असून त्यांची जागा त्यांना २०२४ मध्ये सामान्य जनताच दाखविणार असल्याचे बोलून थेट भाजपावर हल्लाबोल केला. याप्रसंगी मंचावर यवतमाळ जिल्हा कॉंग्रेस चमु हजर होते. साकोली तालुका व शहर काँग्रेस वतीने आ. पटोले यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. प्रसंगी मंचावर कॉंग्रेस कमिटी भंडारा जिल्हा अध्यक्ष मोहन पंचभाई, साकोली तालुका अध्यक्ष डॉ. अशोक कापगते, शहर अध्यक्ष दिलीप मासूरकर, प्रा. होमराज कापगते, जि.प.स. मदन रामटेके, महिला अध्यक्ष छाया पटले, पुष्पा कापगते, सविता ब्राम्हणकर, इंजि. संदीप बावनकुळे, सुनिता कापगते, दिलीप निनावे, विजय साखरे, कुलदीप नंदेश्वर, अश्विन नशिने, उमेश कठाणे, हरगोविंद भेंडारकर आदी उपस्थित होते.
📕 सदर जनसंवाद यात्रेचे आयोजन सेंदूरवाफा झेंडा चौक ते जूने पंचायत समिती सभास्थळी झाले असून साकोली सेंदुरवाफासह तालुक्यातील कॉंग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल, महिला कॉंग्रेस, असंघटीत कामगार सेलचे सर्व पदाधिकारी आणि बहुसंख्य कार्यकर्त्यांचा सभेला जनसागर लोटला होता हे विशेष. जनसंवाद यात्रा व सभेत जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष विवेक बैरागी, विष्णू रणदिवे, दामोधर नेवारे, दिपक थानथराटे, विजय दूबे, आकाश मेश्राम, उमेश भुरे, विनायक देशमुख, नयन पटेल, माधूरी रासेकर, जयश्री भानारकर, असंघटित कामगार शहर अध्यक्ष आदित्य चेडगे, अल्पसंख्याक सेलचे जावेद शेख, ओम गायकवाड, श्रीहरी कापगते, आकाश पुस्तोडे, लालचंद लोथे, डॉ. दिपक मेंढे, स्वीय सहा. उमेश भेंडारकर, नेपाल कापगते, सतीश रंगारी, संदीप गुप्ता, सुरज डुंभरे, पंकज वासनिक, झनकलाल लांजेवार, अनिल डोंगरवार, कृष्णा हुकरे, भास्कर खेडीकर, ललीत खुणे, प्रकाश कुरंजेकर, अनिल भैसारे, दर्यावर डोंगरे, रवि पंचभाई, सुनिल सिडाम, विशाल गजभिये यांसह सर्व कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
[ 🚫 Warning Do not Copy this Global Maharashtra News ]