
भद्रावतीत 10 फेब्रुवारीला होणार प्रभू विश्वकर्मा जयंती महोत्सव: समाज बांधवांना सहभागी होण्याचे आवाहन
भद्रावती प्रतिनिधी:
चंद्रपुर/महाराष्ट्र
दि. 04 जानेवारी 2025
सविस्तर बातमी:- भारतीय वास्तुशास्त्राचे प्रणेते भगवान विश्वकर्मा यांच्या कार्याचा सन्मान म्हणून भद्रावती येथे 10 फेब्रुवारी रोजी प्रभू विश्वकर्मा जयंती महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. या महोत्सवाचे अध्यक्षस्थान मंगेश बुरडकर भूषवणार असून, कार्यक्रमात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये:
महोत्सवाच्या निमित्ताने माननीय माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे विद्यमान अध्यक्ष श्री हंसराज अहिर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
नुकत्याच झालेल्या बैठकीत कार्यक्रमाच्या आयोजनाची तयारी पूर्ण करण्यात आली असून जबाबदाऱ्या निश्चित केल्या गेल्या आहेत. बैठकीस अध्यक्ष मंगेश बुरडकर, उपाध्यक्षा सौ. तेजस्वी निवलकर, सचिव मंगेश अंड्रसकर, सहसचिव मनोज बुरडकर, आणि कोषाध्यक्ष दीपाली बोरीकर उपस्थित होते.
भगवान विश्वकर्मा यांनी द्वारका, हस्तिनापूर, आणि सोन्याची लंका यांसारख्या अद्वितीय वास्तू निर्माण करून भारतीय वास्तुकलेचा पाया घातला. त्यांच्या स्मरणार्थ हा महोत्सव आयोजित केला जात आहे.
समाजासाठी संदेश:
भद्रावतीतील सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन एकोप्याचा संदेश देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.



