चंद्रपूर बॅडमिंटन लीग २०२५ – खेळाडूंच्या कौशल्याचा शानदार उत्सव! फ्लिक मास्टर्सचा दमदार विजय, बिट मास्टर्स आणि रॅकेट रेडर्सचे प्रभावी प्रदर्शन!

54

चंद्रपूर बॅडमिंटन लीग २०२५ – खेळाडूंच्या कौशल्याचा शानदार उत्सव!

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शनजी ची प्रमुख उपस्थिती 

फ्लिक मास्टर्सचा दमदार विजय, बिट मास्टर्स आणि रॅकेट रेडर्सचे प्रभावी प्रदर्शन!

चंद्रपूर/महाराष्ट्र 

दि.12 मार्च 2025

प्रतिनिधी: चंद्रपूर शहर 

सविस्तर बातमी :- चंद्रपूर जिल्हा बॅडमिंटन विकास संघटनेच्या वतीने आयोजित आणि कॅलिबर मायनिंग अँड लॉजिस्टिक्स लिमिटेड प्रस्तुत चंद्रपूर बॅडमिंटन लीग २०२५ स्पर्धा जिल्हा परिषद बॅडमिंटन हॉल, चंद्रपूर येथे ७ ते ९ मार्च दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडली. या प्रतिष्ठित स्पर्धेला पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, जिल्हा परिषद सीईओ विवेक जॉन्सन, प्रोबेशनरी आयपीएस अधिकारी अनिकेत हरदेसीडीबीडीए सचिव ज्वेल चांदेकर, तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांसारख्या मान्यवरांनी उपस्थित राहून स्पर्धेची शान वाढवली. अत्यंत चुरशीच्या सामन्यांमध्ये फ्लिक मास्टर्स संघाने अंतिम विजय मिळवत पहिले स्थान पटकावले, तर बिट मास्टर्स आणि रॅकेट रेडर्स यांनी अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर समाधान मानले. पॅशनेट वॉरियर्स संघाने चौथा क्रमांक मिळवला. विजेत्या संघांचे मालक आणि खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रेक्षकांची मने जिंकली.

ही स्पर्धा खेळाडूंच्या कौशल्याची आणि स्पर्धात्मक वृत्तीची चुणूक दाखवणारी ठरली. खेळाडूंचा उत्साह, संघांची मेहनत आणि चाहत्यांचा प्रतिसाद यामुळे चंद्रपूर बॅडमिंटन लीग २०२५ अविस्मरणीय ठरली. या स्पर्धेच्या यशामागे आयोजक, प्रायोजक आणि सहभागी खेळाडूंचे मोठे योगदान असून, त्यांना मनःपूर्वक धन्यवाद! पुढील वर्षीही अशीच रोमांचक स्पर्धा होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.