
चंद्रपूर : मर्डर केस मधून निर्दोष सुटका – आरोपी विठ्ठल डबरे मुक्त
सेशन केस क्र. 38/2024 मध्ये न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
चंद्रपूर (दि. 11 सप्टेंबर 2025)
रिपोर्ट: अनुप यादव, ग्लोबल महाराष्ट्र न्यूज & ग्लोबल मिशन न्यूज मुख्य संपादक
सविस्तर बातमी :- जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर यांनी गुरुवारी दिलेल्या निकालात विसापूर येथील विठ्ठल गोसाईराव डबरे (रा. वॉर्ड नं. 1, ता. बल्लारपूर) याला निर्दोष घोषित करून सुटका केली. आरोपीवर भा.द.वि. कलम 302 व 450 अंतर्गत खुनाचा गंभीर आरोप ठेवण्यात आला होता.
खटल्याची पार्श्वभूमी
22 जानेवारी 2024 रोजी विसापूर गावात सचिन वंगले या तरुणाचा त्याच्या घरात चाकूने पाच घाव घालून खून करण्यात आला होता. अज्ञात आरोपीने त्याला ठार करून खोली बाहेरुन बंद केली होती. या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणात दोन वर्षांपूर्वी मृतकासोबत झालेल्या वादाच्या कारणावरून पोलिसांनी संशयित म्हणून विठ्ठल डबरेला अटक केली होती. मात्र कुटुंबीय व स्थानिकांनी सुरुवातीपासूनच पोलिसांनी चुकीच्या संशयावरून कारवाई केली असल्याचे म्हटले होते.
न्यायालयीन प्रक्रिया
खटल्यादरम्यान आरोपीचे अधिवक्ता अॅड. संजय प्र. बाजपेयी (बल्लारपूर) यांनी ठोस व पुराव्याधारित युक्तिवाद मांडले.
- आरोपी घटनेच्या वेळी घटनास्थळी उपस्थित नव्हता.
- पोलिसांकडे कोणताही निर्विवाद पुरावा नव्हता.
- संशयाच्या आधारे आरोपीला दीर्घकाळ तुरुंगात ठेवण्यात आले.
न्यायालयाने या मुद्द्यांचा गंभीरपणे विचार करून, “आरोपीविरुद्ध कोणताही ठोस पुरावा आढळला नाही,” असे स्पष्ट केले आणि अखेर डबरेला निर्दोष घोषित केले.
20 महिन्यांनंतर सुटका
गेल्या 20 महिन्यांपासून कारागृहात असलेल्या डबरेची अखेर 11 सप्टेंबर 2025 रोजी अधिकृत सुटका करण्यात आली. न्यायालयीन निर्णयानंतर कुटुंबीयांनी दिलासा व्यक्त केला तर मृतकाच्या कुटुंबीयांनी “खरा गुन्हेगार सापडला पाहिजे” अशी मागणी केली.
हा निकाल न्यायालयीन प्रक्रियेत पुराव्याचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला आहे. चुकीच्या संशयावरून अटक केल्यास निरपराधांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
एक वर्ष पुर्वी चार विडिओ. 👇👇👇



